राज्यात या दिवशी दाखल होणार मान्सून !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ जून २०२३ ।  देशातील बदलत्या हवामानामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस दाखल झाला आहे. केरळमध्ये मुसळधार पावसासह गुरुवारी मान्सूनचे आगमन झाल्याची औपचारिक घोषणा भारतीय हवामान विभागाने केली. ७ दिवस केरळपासून ४०० किमी दूर अडकलेला मान्सून गुरुवारी वेगाने वाढला आणि एकाच दिवशी केरळला पार करत कर्नाटकमध्ये दाखल झाला. दुसरीकडे तामिळनाडूतही मान्सूनचा पाऊस सुरू झाला. हवामान विभागानुसार, मान्सून १० जूनपर्यंत दक्षिणेतून महाराष्ट्रात दाखल होईल आणि ईशान्येकडील राज्यांना कव्हर करत पश्चिम बंगालमार्गे बिहारपर्यंत पोहोचेल. १५ जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड व संपूर्ण बिहारला कव्हर करू शकतो. २० जूनपर्यंत गुजरात व मध्य प्रदेशच्या उत्तर भागातून पुढे सरकत राजस्थानात दाखल होऊ शकतो.

मान्सून १८ जूनदरम्यान मुंबईसह तळकोकणात येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत स्थिरावल्यानंतर तो सह्याद्री ओलांडत उर्वरित महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणत: दहा दिवसांनी तो राज्यात येतो. १० जूनपर्यंत मान्सून कर्नाटकात दाखल होण्याची शक्यता असून त्यानंतर तो तळकोकणासह मुंबईत येईल. शुक्रवारपासून (दि. ९) १२ जूनपर्यंत मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम