राज्यात या दिवशी होणार मान्सूनला सुरुवात !
दै. बातमीदार । २० मे २०२३ । दरवर्षी उन्हाळ्यात भयानक उन तापत असते. पण उन्हाळ्यात कधी पाऊस पडत नाही पण यंदा उन्हळ्यात पाऊस हि पडला व उन देखील चांगलेच तापल्याने अनेक शेतकरी हैराण झाले आहे. दरवर्षी साधारपणे मान्सून 22 मे रोजी अंदमानात, 1 जून’ला केरळमध्ये तर 7 जून रोजी महाराष्ट्रात दाखल होत असतो. मात्र, यावर्षी मान्सून उशिराने दाखल होणार आहे. नैऋत्य मान्सून 22 मे रोजी अंदमानात दाखल होत असतो. दक्षिण भारतीय महासागरात चक्रिवादळ तयार होत असल्याने बाष्प तिकडे ढकलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मादागास्कर परिसरात उच्च दाब तयार होण्यास आणखी काही दिवसांचा काळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मान्सूनचे ढग तयार होण्यास उशिर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मात्र यावर्षी तो दोन ते तीन दिवस लवकर आंदमानच्या समुद्रातील काही भागात दाखल झाला आहे. यानंतर दोन ते तीन दिवसात मान्सून अंदमानच्या समुद्रासह अंदमान, निकोबारच्या काही भागांमध्ये तसेच दक्षिण बंगालच्या उपसागरात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
अंदमानात दरवर्षी 22 मे’ला दाखल होणारा मान्सून यंदा तीन ते चार दिवस अगोदर दाखल झाला आहे. साधारणपणे 1 जून रोजी केरळात दाखल होणारा मान्सून यावर्षी चार दिवस उशिराने म्हणजेच 4 जून रोजी दाखल होणार आहे. त्यामुळे यंदा मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. स्कायमेट या खासगी एजन्सीनेही मान्सून अंदमानात उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील मान्सूनच्या आगमनावर होणार आहे. दरवर्षी साधारणपणे 7 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होत असतो. मात्र, यावर्ती तो उशिराने म्हणजेच 9 जून रोजी दाखल होणार आहे. तर मुंबईकरांना 15 जून पर्यंत मान्सूनची वाट बघावी लागणार आहे. ‘वेगारीस ऑफ द वेदर’ने याबाबचे भाकीत वर्तवले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम