जास्त झोप घेणे बेतू शकते जीवावर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ ऑगस्ट २०२३ | अनेकांना सुट्टीच्या दिवशी खूप झोप घेण्याची सवय असते पण हीच सवय खूप महागात पडत असते. झोप ही आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. अनेकदा जीवनशैलीमुळे शरीराला पुरेशी झोप मिळत नसल्याने लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

परंतु एका अभ्यासानुसार, सुट्टीच्या दिवशी रोजच्या तुलनेत 90 मिनिटे जादा झोप घेतली तरीही ती आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.द युरोपियन जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, कामाच्या दिवसात कमी वेळ झोप घेण्याची शरीराला सवय झालेली असते. अशावेळी एखाद्या सुट्टीच्या दिवशी जर जास्त झोप घेतल्यास तुमच्या शरीर चक्रात बदल होतात. त्यामुळे हृदयविकारासह स्ट्रोक येण्याचा देखील धोका वाढू शकतो.Eye Problem : चष्म्याचा नंबर कमी करायचाय? मग हे घरगुती उपाय ठरतील प्रभावीखराब जीवनशैलीमुळे आरोग्य खराब होणे, स्वभावात सतत वाईट बदल होणे, थकवा जाणवणे तसेच दिवसभर डोळ्यावर झोप येणे असे दुष्परिणाम होत असतात.

शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे झोपेची नियमितता आणि झोपेची वेळ आपल्या आरोग्याचे अविभाज्य घटक आहेत, तेव्हा जर गरजेपेक्षा कमी झोप घेतली किंवा एखाद्या दिवशी गरजेपेक्षा जास्त झोप घेतली तर शरीराचे चक्र भिघडून हृदयविकारांवर धोका वाढू शकतो.झोपेचे नियमन कसे करावे?चांगली झोप मिळण्यासाठी शरीराला चांगल्या सवयी लावणे गरजेचे असते. तेव्हा चांगली झोप यावी म्हणून तुम्ही योग, ध्यानधारणा, स्ट्रेचिंग, प्राणायाम करणे उपयुक्त ठरू शकते. झोपेचे वेळापत्रक योग्य राखण्यासाठी, नियमित व्यायामाचे वेळापत्रक निश्चित करा. वर्कआउट केल्याने मेलाटोनिनच्या उत्पादनास प्रोत्साहन देऊन तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत होते. तसेच झोपेला उशीर होऊ नये म्हणून रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी करावे. यामुळे तुमच्या शरीराला जेवण पचण्यास पुरेसा वेळ मिळतो आणि झोप शांत लागते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम