देशातील सर्वात असुरक्षित राज्य ; संजय राऊतांची टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० जानेवारी २०२३ खरी शिवसेना कोणाची? यावर गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. सत्तासंघर्ष निर्णयक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. सुनावणीपूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधताना महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वात असुरक्षित राज्य असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या वाक्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.

दरम्यान सुनावणीपूर्वी संजय राऊत यांनी एक शेर ट्विट केले आहे. ‘मन मे हमेशा जीत की आस होनी चाहिए… नसीब बदले या ना बदले,वक्त जरुर बदलता है’, अशा मजकूराचा हा शेर आहे. कोर्टाकडून अपेक्षित अशा गोष्टी घडणार का हे पाहवं लागणार आहे. मात्र सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे. यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागच्या सुनावणीवेळी केली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम