सण, उसत्व जयंती च्या पार्श्वभूमीवर पोलीस पथकाचे संचलन

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

आगामी काळात होणाऱ्या श्रीराम रथोत्सव, महावीर जयंती, हनुमान जयंती, क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद या विविध सणाच्या पार्श्वभूमीवर भडगाव पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस पथकाचे संचलन पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले,
संचलन ची सुरवात पोलिस स्टेशनापासून मेन रोड मार्गाने आझाद चौक, टोणगाव, बाळद रोड, पारोळा चौफुली, बस स्टॅन्ड जवळून समारोप हा पोलिस स्टेशन येथे करण्यात आला. या पथक संचलनात पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालक यांच्या सह २५ पोलीस अंमलदार, ३० होमगार्ड, एक आर. सी. पालटून आदि कर्माचारी या संचलनात हजर होते. अशी महिती गोपनीय विभागाचे पो. हे. कॉ. विलास पाटील व पो. कॉ. स्वप्नील चव्हाण यांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम