खासदार सुप्रिया सुळेचा डंका देशभर ; ‘टॉप-टेन’मध्ये मारली बाजी !
दै. बातमीदार । २४ मार्च २०२३ । देशभर नेहमीच शरद पवार यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे यांचा डंका वाजत असतो तसे आहे देखील त्यांच्या लोकसभा मतदार संघातील कामे बघता राज्यातील खासदारामध्ये त्यांचा नेहमी अव्वल नंबर देखील येत असतो पण यंदा देशातील ‘टॉप-टेन’ खासदारांमध्ये महाराष्ट्राची बाजी मारली आहे. सतराव्या लोकसभेत आतापर्यंतच्या कामगिरीनुसार बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पहिल्या नंबरवर आहेत. यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तर दुसरा क्रमांक मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पटकावला आहे.
तसेच यामध्ये तमिळनाडूतील दोन (सेंथीलकुमार एस आणि धनुष एम. कुमार), राज्यस्थान (पी. पी. चौधरी), उत्तरप्रदेश (पुष्पेंद्रसिंह चंदेल), कुलदीप राय शर्मा (अंदमान आणि निकोबार), झारखंड (विद्युत बरन महतो) येथील एकेक खासदार या यादीत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील शिवसेनेचे राहूल शेवाळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याणचे डॉ. श्रीकांत शिंदे हे इतर दोन खासदार ‘टॉप-टेन’मध्ये आहेत. याबाबत काल नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिक’ संस्थेमार्फत सतराव्या लोकसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील खासदारांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले आहे.
यामध्ये सक्रिय सहभागी होणा-या ‘टॉप-टेन’ खासदारांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी वेगवेगळ्या चर्चेत भाग घेतला आहे. तसेच १४८ वेळा चर्चेत सहभाग घेत खासदार श्रीरंग बारणे यांनी ५०८ प्रश्न विचारले आहेत. दहा टक्के खासगी विधेयकेही मांडली आहेत. सभागृहात त्यांची उपस्थिती ९४ टक्के आहे. यामुळे त्यांचा देखील या यादीत समावेश करण्यात आला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम