खा.सुप्रिया सुळे करणार मंत्री गडकरींसोबत चर्चा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ एप्रिल २०२३ ।  कोल्हापूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. रात्री 2:15 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. सर्व प्रवासी गाढ झोपेत असतानाच ही घटना घडली. पुण्यातील पुणे-बेंगलोर महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये 22 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच कात्रज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.

अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर चारजणांचे मृतदेहही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घटना स्थळाला भेट दिली. त्यानंतर जखमी प्रवाश्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर या घटना वारंवार घडत आहेत. याबद्दल उपाययोजना करणे गरजेचे असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. तर “नवले पूल येथील अपघाताच्या घटनेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीदेखील चर्चा करणार” असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्समध्ये एकूण 21 प्रवासी, 1 ड्राइवर आणि एक क्लिनर असे एकूण 23 जण होते. साखरेच्या ट्रकमध्ये एक ड्राइवर, 2 मालक असे एकूण 3 जण होते. त्यापैकी ससून हॉस्पिटल येथे 05, चव्हाण हॉस्पिटल येथे 09 व नवले हॉस्पिटल येथे 06, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे 02 असे एकूण 22 जण उपचार घेत आहेत. मृत झालेल्या 4 पैकी 3 जणाची ओळख पटली आहे. मृत झालेल्या 4 पैकी 3 जण ही कोल्हापूरचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये एका लहान बाळाचा देखील समावेश आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम