तालुका मराठा समाज कार्यकारणी निवड अध्यक्ष पदी जयवनत राव पाटील उपाध्यक्ष पदी पत्रकार संजय पाटील

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी ) तालुका मराठा समाज अध्यक्षपदी मारवड संस्थेचे चेअरमन जयवंतराव पाटील ,उपाध्यक्षपदी पत्रकार संजय पाटील व सचिवपदी माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मराठा मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
कार्यकारिणीत समाजासाठी जागा देणाऱ्या कुटुंबातील सदस्य कायम एक उपाध्यक्ष असतो त्यात राजेंद्र देशमुख ,कोषाध्यक्ष म्हणून सात्री चे माजी सरपंच महेंद्र बोरसे ,सहसचिव माजी नगरसेवक प्रवीण पाटील ,कार्यकारिणी सदस्य एस. एम. पाटील , मनोहर छबु पाटील , शेतकी संघ मुख्य प्रशासक संजय पाटील ,कैलास पाटील ,पत्रकार चंद्रकांत काटे ,स्वप्नील पाटील , जयप्रकाश पाटील, गौरव उदय पाटील, संजय शाळीग्राम पाटील, डॉ सुमित पाटील ,भूषण भदाणे यांची निवड करण्यात आली. तर कायम निमंत्रित सदस्य म्हणून आमदार अनिल पाटील ,माजी आमदार डॉ बी एस पाटील ,माजी आमदार साहेबराव पाटील ,माजी आमदार स्मिता वाघ , माजी कुलगुरू शिवाजी पाटील , माजी नगराध्यक्ष विनोद पाटील , माजी नगराध्यक्ष प्रभाकर पाटील ,सुलोचना वाघ ,पद्मजा पाटील यांचा समावेश आहे.
नूतन कार्यकारिणीचा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी आमदार साहेबराव पाटील व स्मिता वाघ यांच्यासह अनेकांनी निवडीचे स्वागत केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम