
मराठा सेवा संघाच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी रामेश्वर भदाणे तर शहराध्यक्ष पदी डॉ. कुणाल पवार यांची निवड..
अंमळनेरर (प्रतिनिधी)नुकतीच अमळनेर तालुका मराठा सेवा संघाची बैठक पार पडली. अमळनेर तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी रामेश्वर भदाणे तर शहराध्यक्ष पदी डॉ. कुणाल पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी तालुका कार्याध्यक्ष पदी अशोक पाटील, उपाध्यक्ष पदी बापूराव पाटील, प्रा. डॉ पी. एस. पाटील, सचिव पदी प्रेमराज पवार, तर विविध पदांवर ऍड. उदय शिसोदे, संदीप खैरनार, उदय पाटील, इंजि. उदय पाटील, संजय सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, गंगासागर वानखेडे, यांची निवड करण्यात आली तसेच अमळनेर शहर सचिव पदी दीपक रामलाल पाटील, शहर कार्याध्यक्ष पदी दीपक रमेश काटे, शहर उपाध्यक्ष पदी अनंत धर्मराज सूर्यवंशी व लक्ष्मण नथ्थु पाटील, सहसचिव पदी खेमचंद पाटील, सहसंघटक पदी प्रवीण राजधर पाटील आणि योगेश लक्ष्मण भदाणे, प्रसिद्धी प्रमुख पदी अमोल रामलाल पाटील, तसेच नरेंद्र राजाराम पाटील व दिलीप ठोकेदार यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी अमळनेर तालुका मराठा समाजाच्या नवनियुक्त पदाधिकारी यांचे ही मराठा सेवा संघातर्फे निवडीबद्दल स्वागत व सत्कार करण्यात आला. अमळनेर मराठा समाजाचे नवनियुक्त अध्यक्ष जयवंत मंसाराम पाटील, उपाध्यक्ष संजय कृष्णा पाटील, विक्रांत पाटील, कैलास पाटील यांचा मराठा सेवा संघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सेवा संघाचे मार्गदर्शक प्रा. लिलाधर पाटील, मनोहर नाना पाटील, प्रा.डॉ. विलास पाटील, प्रा. बी. ए. पाटील उपस्थित होते. यावेळी मराठा सेवा संघाच्या तालुका व शहर कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील काळात वर्षभर विविध सामाजिक, साहित्यिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले जाणार असून अमळनेर तालुक्याला उत्तम वैचारिक कार्यक्रम देण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघ करणार असल्याची घोषणा सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आली. नवनियुक्त मराठा सेवा संघाच्या अमळनेर तालुका नवनियुक्त पदाधिकारी यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी प्रा. लीलाधर पाटील, संजय कृष्णा पाटील, जयवंत मंसाराम पाटील, रामेश्वर भदाणे, रामकृष्ण बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी व आभार प्रेमराज पवार यांनी मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम