एरंडोल मध्ये वाईन शॉपवर MRP पेक्षा जादा दराने विक्री

वाईन शॉप चालक म्हणतात साहेबाना हप्ता द्यावा लागतो म्हणून जास्त पैसे घेतो

बातमी शेअर करा...

एरंडोल मध्ये वाईन शॉपवर MRP पेक्षा जादा दराने विक्री

वाईन शॉप चालक म्हणतात साहेबाना हप्ता द्यावा लागतो म्हणून जास्त पैसे घेतो

वाईन शॉप चालकाची ग्राहकांशी अरेरावीची भाषा; वाटेल तर घ्या

एरंडोल l  प्रतिनिधी

येथील कासोदा रोड जवळ असलेल्या वाईन शॉप वरून MRP पेक्षा दहा रूपये जादा पैसे घेऊन दारूची विक्री होत आहे. वाईन शॉप चालकास जाब विचारला असता आम्हाला साहेबाना हप्ता द्यावा लागतो तो कुठून द्यायचा? असा सवाल करीत अरेरावीची भाषा करत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. तसेच नियमानुसार वाईन शॉप मध्ये MRP दराने दारू मिळेल असा बोर्ड देखील दर्शनीय भागावर लावलेला नाही.

ज्याला गरज असेल त्याने जादा दराने दारू घ्यावी आम्हाला गरज नाही अशी दर्पोक्तीची भाषा वाईन चालक करीत आहेत. आता कोणत्या साहेबांना हप्ता द्यावा लागतो हे वाईन शॉप चालकच सांगू शकतो. या संपूर्ण प्रकाराची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या आधिक्षकांनी चौकशी करून वाईन शॉप चालकावर कारवाई करण्याची मागणी एरंडोल शहरासह तालुक्यातून होत आहे.

जर राज्य उत्पादन शुल्क विभागातील कोणताही अधिकारी हप्ता घेत नसेल तर सदर वाईन शॉपमधील दर्शनीय भागात शासकीय नियमानुसार MRP दराने दारू मिळेल असा बोर्ड लावण्यात येईल, आणि MRP दराने दारूची विक्री होईल.

आता या वाईन शॉप चालकावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक काय कारवाई करतात या कडे लक्ष लागून आहे.

दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. भुकन यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.

हे ही वाचा 👇

“तासखेड्याच्या महिलांनी दारूबंदी साठी कसली कंबर सावदा पो .स्टे. ला आक्रोश मोर्चा

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम