
गोवंशाच्या वासरावर अनैसर्गिक कृत्य
मुक्ताईनगर तालुक्यात निषेधार्थ बंद
मुक्ताईनगर प्रतिनिधी
तालुक्यातील बेलसवाडी येथे १५ मार्च रोजी घडलेली घटना अत्यंत संतापजनक आणि निंदनीय आहे. एका विशिष्ट धर्माच्या अल्पवयीन मुलाने गोवंशाच्या वासरावर अनैसर्गिक कृत्य केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या कृत्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
घटनेच्या विरोधात मुक्ताईनगर तालुक्यातील सकल हिंदू समाज बांधवांनी बंदची हाक दिली होती. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून, केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानदारांनीच आपली दुकाने उघडी ठेवली, इतर सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली. यामध्ये व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांचा सक्रिय सहभाग दिसून आला.
मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात या घटनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला अटक केली गेली आहे. याचबरोबर, आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक समाजाच्या वतीने केली जात आहे.
या घटनेमुळे क्षेत्रातील वातावरण तणावपूर्ण झाले असून, सर्वांनी शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम