व्याघ्र संरक्षित क्षेत्रातून दोन शिकाऱ्यांना बंदुकीसह पकडले; वनविभागाची यशस्वी कारवाई!

बातमी शेअर करा...

व्याघ्र संरक्षित क्षेत्रातून दोन शिकाऱ्यांना बंदुकीसह पकडले; वनविभागाची यशस्वी कारवाई!

मुक्ताईनगर प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील वडोदा वनपरिक्षेत्र आणि प्रस्तावित ‘मुक्ताई-भवानी अभयारण्य’ अंतर्गत येणाऱ्या व्याघ्र अधिवास असलेल्या सुकळी नियत क्षेत्रात अवैध शिकार करणाऱ्या दोन संशयितांना दोन देशी बंदुकीसह ताब्यात घेऊन वनविभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

वन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२.२० वाजता मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वडोदा वनपरिक्षेत्र अधिकारी आणि डोलारखेडा कर्मचारी वनपरिमंडळात गस्त घालत होते. यावेळी कक्ष क्रमांक ५४२ (सुकळी नियत क्षेत्र) मध्ये दोन व्यक्ती देशी बंदुकीसह चित्त्याच्या शिकारीसाठी अवैधरित्या घुसल्या असताना दिसून आल्या.

वन विभागाचा मागोवा लागताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी त्वरित पाठलाग करून त्यांना यशस्वीपणे पकडले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून दोन देशी बंदुकी जप्त करण्यात आल्या. अटक करण्यात आलेले संशयित अजीज अन्सारी (वय २९) आणि जलील अहमद (वय ५०) असे आहेत. वन विभागाकडून सखोल चौकशी सुरू असून, सर्व बाजूंनी तपास केला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ही कारवाई जळगाव उपवनसंरक्षक राम धोत्रे आणि सहाय्यक वनसंरक्षक सुदर्शन शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे, डोलारखेडा वनपाल गणेश गवळी, वनरक्षक गोकुळ गोसावी, नवल जाधव, नितीन खंडारे, रजनीकांत चव्हाण, अक्षय मोरे आणि सुधाकर कोळी यांनी यशस्वीपणे पार पाडली. वन विभागाच्या या धाडसी कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम