मुंबई पाण्यात ; मुख्यमंत्री म्हणाले स्वागत करा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ जून २०२३ ।  राज्यात पावसाळा सुरु झाला असून पहिलाच पाऊस मुंबईत कोसळला आहे. शनिवारी अनेक ठिकाणी पाऊस बरसला. मुंबईतही काल मुसळधार पाऊस झाला. मात्र पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. मात्र मुंबईतील या पावसाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. ‘पाऊस झाला त्याचे स्वागत करा, पाणी साचल्याची तक्रार का करता?’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा मंदिर अमृत महोत्सवानंतर 24 जून रोजी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, “आज पाऊसाची चांगली सुरुवात झाली आहे. बळीराजा आणि आपण सगळे त्याचं आनंदाने स्वागत केले पाहिजे. गेले अनेक दिवस आपण पावसाची आतुरतेने वाटत पाहत होतो. आज पाऊस चांगला सुरू झाला आहे. राज्यभर पेरण्या झाल्या आहेत. आजचा पाऊस शेतकऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे. पाऊस झाल्याने सर्वांना मनापासून आनंद झाला आहे.”

यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेवरही भाष्य केले ते म्हणाले, “सरकारवर दररोज खालच्या पातळीवरील आरोप होत आहेत. काही दिवसांपूर्वी माझा नातू रुद्रांशलाही राजकारणात ओढलं गेलं. त्या लहान मुलाला राजकारण काय कळते. सध्या पातळीसोडून बोललं जात आहे आणि हे सर्वजण पाहत आहेत.”

मुंबईत झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसात नाल्यात पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. महापालिकेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खासगी कंत्राटदाराच्या दोन कामगारांचा मॅनहोलमध्ये सफाई काम करताना पडून वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. रामकृष्ण आणि सुधीर दास अशी मृतांची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर प्रतीक्षा करीत होते त्या पावसाने शनिवारी जोरदार बॅटिंग केली. किंग्ज सर्कल, टिळकनगर, अंधेरी, दहिसर सब वे, मिलन सब वे, सायन रोड नंबर आणि अन्य काही सखल भागांत पावसाचे पाणी काही प्रमाणात साचले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम