
दै. बातमीदार । ७ मार्च २०२३ । गेल्या सहा महिन्याआधी राज्यातील राजकारणात जी खेळी झाली होती. त्याचे पडसाद यंदाच्या होळीत उमटले असल्याची दिसू लागले आहे. राज्यातील अनेक मित्र मंडळाच्या होळीतून ५० खोके एकदम ओके असा संदेश देणारे फलक झळकले होते. त्याच होळीची चर्चा राज्यभर होवू लागली आहे.
मुंबईतील विलेपार्ले इथं होळीनिमित्त ५० खोक्यांची होळी तयार करण्यात आली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरलं झाला आहे. होळीच्या सणानिमित्त राजकीय टोलेबाजी यानिमित्त करण्यात आली आहे. नवयुग तरुण मंडळाच्या होळीचा हा व्हिडिओ असल्याचं कळतंय.
शिवसेनेत बंड केलेल्या पन्नास आमदारांना डिवचण्यासाठी विरोधकांनी वारंवार उल्लेख केलेली ‘पन्नास खोके, एकदम ओके’ ही घोषणा प्रसिद्ध झाली आहे. हाच धागा पकडून विलेपार्ले येथील बामणवाडामधील नवयुग तरुण मंडळानं होळीनिमित्त ५० खोक्यांचा मनोरा रचला आहे. विशेष म्हणजे या प्रत्येक खोक्यावर जनतेला भेडसावत असलेले प्रश्न मांडण्यात आले आहेत. यामध्ये गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ, अदानी प्रकरण, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, महिला अत्याचार, विजेचं वाढतं बिल, बेरोजगारी, जीडीपी, रुपयाची घसरण असे अनेक मुद्दे यातून उपस्थित करण्यात आले आहेत. पन्नास खोक्यांवर या विषयीचे स्टिकर चिकटवून त्याचा मनोरा उभारण्यात आला आहे. तसेच हे सर्व प्रश्न जाळून जनतेला दिलासा मिळावा असा संदेशही यातून देण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम