मुस्लिम समाजातर्फे महाआरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न
पारोळा
येथील दिनांक 16 रोजी जशने ईद मिलादुन्नबी निमित्त पारोळा समस्त मुस्लिम समाजातर्फे महाआरोग्य व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होता.
यावेळी शिबिरामध्ये डोळे तपासणी, शुगर, ब्लड प्रेशर, हार्ट तपासणी करण्यात आली तसेच या शिबिरामध्ये पारोळा शहरात रेकॉर्ड ब्रेक 160 रक्तदात्यांनी रक्तदान केला व आरोग्य शिबिर मध्ये 145 रुग्णांना लाभ घेतला.
या शिबिरामध्ये भोले विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व श्री साई हॉस्पिटल यांनी अनमोल सहकार्य केले. डॉ.राहुल कुवर, डॉ. गिरीश वडगावकर डॉ. थोरात व डोळे तपासणी शिबिर मध्ये राकेश राजपूत व रक्तदानसाठी बाळासाहेब गव्हाणे, शुभम गव्हाणे, समाधान आढाव यांचे अनमोल सहकार्य लाभले.
या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सुनील पवार, पत्रकार मंडळी, तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ डॉ. शांताराम पाटील, महेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले व सर्व राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या तसेच मुस्लिम समाजातर्फे जुबेर भाई शेख मोहम्मद पठाण, फारुख शेख, इम्रान शेख, सलिम पटवे .सादिक पिंजारी, फिरोज पिंजारी, डॉक्टर आसिफ कुरेशी, मोहम्मद खान बेलदार, नईम पटवे, कय्युम खान आकीफ खाटीक, बिलाल शेख, सलमान सय्यद , हसीब शेख, मोईद्दीन शेख यांनी सहकार्य केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम