कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितित ड्रोनच्या सहाय्याने नॅनो युरीया फवारणी

advt office
बातमी शेअर करा...

औरंगाबाद  दि ४ सप्टेबंर | कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व सूचनेनुसार कृषी विभाग, इफको व एरोनिका ड्रोन प्रा. ली. यांच्या संयुक्त विद्यमाने सिल्लोड तालुक्यातील वांगी बु. येथे ड्रोनच्या सहाय्याने नॅनो युरिया फवारणी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती .

 

ड्रोन द्वारे फवारणी केल्याने शेतकऱ्यांना होणारे फायदे याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांनी आता शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांना पीक विमा पोलिसी प्रमाणपत्राचे वाटप ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमानिमित्त वांगी बु. ग्रामपंचायतीच्या वतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

 

यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर , नॅशनल सुत गिरणीचे उपाध्यक्ष नरेंद्र ( बापू ) पाटील, संचालक राजेंद्र ठोंबरे, पं. स. माजी उपसभापती काकसाहेब राकडे, माजी जि.प. सदस्य कौतिकराव मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण, माजी पं. स. सदस्य निजाम पठाण, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश साळवे, गणेश ढोरमारे, भराडीचे उपसरपंच गजानन महाजन, जिनिंग प्रेसिंगचे व्हाईस चेअरमन अनिस पठाण , सरदार लखवाल, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, इफकोचे मराठवाडा विभागीय व्यवस्थापक सुनील कुलकर्णी, विदर्भ फेडरेशन कार्पोरेशन ली.चे व्यवस्थापक राहुल चौधरी, यांच्यासह वांगी बु. च्या सरपंच ज्योती बापूराव काकडे, ग्रा. प.सद्स वैशाली कैलास काकडे, पोपट साळवे, माधवराव तायडे, तंटामुक्त अध्यक्ष भारत काकडे,लक्ष्मण साळवे, प्रकाश काकडे, संजय काकडे, काशिनाथ काकडे, रमेश काकडे,कृष्णा काकडे ,रघुनाथ साळवे आदींसह गावकरी व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम