नारायण राणेंनी लावला उद्धवजींना फोन…
दै. बातमीदार । १३ जून २०२३ । राज्यातील अनेक नेते सध्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या मराठी शोमध्ये हजेरी लावत मनमोकळेपणाने गप्पा मारत आहे. याच कार्यक्रमात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा आले आहेत. यादरम्यान राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले. संजय राऊत यांना खासदार मी केलं नाहीतर झाला नसता असा खुलासा नारायण राणे यांनी यावेळी केला आहे. यावेळी राणे यांनीं थेट ठाकरेंना फोन लावल्याचे देखील पाहायला मिळते.
यापूर्वी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे अभिनेता श्रेयस तळपदे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. आता थेट केंदीय मंत्री नारायण राणे यांनी या शोमध्ये येत दिलखुलासपणे प्रश्नाची उत्तरे दिल्याचे समजते. येत्या 18 जून रोजी या शोचा भाग प्रसारित होणार आहे.
खुपते तिथे गुप्ते या अवधूत गुप्ते यांच्या शोमध्ये नारायण राणे यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केल्याचे समजते. याचा एक प्रोमो देखील समोर आला आहे. यावेळी राणेंना संजय राऊत यांची एक व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली. “नारायण राणे फक्त पोपटासारखे बोलत असतात, आता फक्त एवढंच सांगायचं बाकी आहे, की बाळासाहेब ठाकरेंना शिवसेना प्रमुख म्हणून मी नेमलं” असं राऊत या क्लीपमध्ये बोलताना दिसतात. यावर नारायण राणे उत्तर देतात,”याला खासदार मी केलं.. तेव्हा खासदार झाला नसता तर पुढे देखील कधीच खासदार दिसला नसता. हे माझं पाप आहे” मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा कुटुंबासह घर सोडल्याचा दावा देखील यावेळी राणेंनी केल्याचे समजते. तसेच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राणे हे फोन घेऊन उद्धव ठाकरेंना फोन लावताना देखील दिसले आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम