नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचा उपक्रम कौतुकास्पद – आमदार अमोल पाटील

७३ दात्यांनी केले रक्तदान

बातमी शेअर करा...

पारोळा (प्रतिनिधी)

पारोळा – राज्यात अनेक अपघात होतात.त्यात रक्तस्राव होऊन रुग्णास रक्ताची अत्यंत गरज भासते.रक्तामुळे अनेकांचे प्राण वाचुन जिवदान मिळते म्हणून रक्तदानापेक्षा श्रेष्ठदान कोणतेही नसून नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे उद्गगार आमदार अमोल पाटील यांनी काढले.

पारोळा येथील कुटीर रुग्णालयात जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी ते बोलत होते.यावेळी शिवसेना शहर प्रमुख अमृत चौधरी,मुंदाणे येथील एकनाथ पाटील,राजेंद्र चौधरी,पत्रकारात योगेश पाटील, दिलीप सोनार,विकास चौधरी, प्रकाश पाटील,संप्रदायाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिवाजी शेकळे, माजी जिल्हा महीला अध्यक्षा आशाताई पाटील,तालुकाध्यक्ष खुशाल पाटील,तालुका महिला अध्यक्षा रोहिणी साळी,तालुका कॅप्टन सुनिता पाटील,भगवान चौधरी,ईशान भालेराव,दत्तात्रय बागुल,धनराज खैरनार,राजू शिंपी,प्रकाश पवार,रूपेश क्षत्रिय आदी उपस्थित होते.यावेळी रक्तदान शिबिरात ७३ दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. शिबिरात सहभागी दात्यांना उद्घाटक आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.रक्त संकलन जिवन ज्योती ब्लड बँक धुळे यांनी केले.शिबिर यशस्वीतेसाठी संप्रदायातील सर्व भक्तगणांनी परिश्रम घेतले.कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रशांत रनाळे,डॉ जिनेंद्र पाटील,डॉ प्रशांत सोनवणे,डॉ गिरीष जोशी, डॉ सुनिल पारोचे,कर्मचारी राजू वानखेडे,प्रेम वानखेडे,विशाल गोयर,परिचारिका कल्पना चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम