
उड्डाणपुलावरील भीषण अपघातात जुळ्या भावांपैकी एक ठार, दुसरा गंभीर जखमी
दुचाकीचा ताबा सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली
उड्डाणपुलावरील भीषण अपघातात जुळ्या भावांपैकी एक ठार, दुसरा गंभीर जखमी
दुचाकीचा ताबा सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली
जळगाव प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील उड्डाणपुलावर ३१ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने एका जुळ्या भावाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
चैतन्य सुपडू फेगडे (वय २२, रा. निंभोरा, ता. रावेर) आणि त्याचा जुळा भाऊ चेतन फेगडे हे दोघे घरकुल योजनेच्या कामानिमित्त आपल्या आई-वडिलांसह जळगावकडे निघाले होते. वडील रिक्षाने पुढे गेले असताना, दोन्ही भाऊ दुचाकीवर (क्र. MH 19 EE 1702) मागून येत होते. नशिराबादजवळील उड्डाणपुलावर दुचाकीचा ताबा सुटल्याने ती दुभाजकाला धडकली.
या अपघातात चैतन्यचा जागीच मृत्यू झाला, तर चेतनला तात्काळ जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम