नशिराबाद येथे ८० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन

बातमी शेअर करा...

नशिराबाद येथे ८० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला; पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन

नशिराबाद (प्रतिनिधी) – नशिराबाद गावातील हॉटेल सावनसमोर अंदाजे ८० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवारी (३० मे) दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात दुपारी २ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल सावनचे मालक योगेश चव्हाण यांनी महिलेच्या मृतावस्थेतील निदर्शनास येताच तत्काळ नशिराबाद पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित महिलेला रुग्णवाहिकेद्वारे जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेला मृत घोषित केले.

मयत महिलेच्या जवळून ओळख पटवण्यास मदत होईल, अशी कोणतीही कागदपत्रे अथवा वस्तू आढळून आलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांनी पुढे येऊन ओळख पटवण्यास मदत करावी, असे आवाहन केले आहे.

या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र ठाकरे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम