राष्ट्रवादी फुटलीच आहे ; विरोधी पक्षनेते वडेट्टीवार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २७ ऑगस्ट २०२३ | राज्यातील महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी थेट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी आता टीकास्त्र सोडले असून तर दुसरीकडे शरद पवार म्हणत आहे कि राष्ट्रवादी फुटली नाही त्यावर आज कॉंग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी सावध साधला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, शरद पवारांच्या सभेला प्रतिसभा घेऊन उत्तर दिले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी 100 टक्के फूटली आहे, असेच म्हणावे लागेल. राष्ट्रवादीचे 9 आमदार फुटून सत्तेत सामील झाले आहेत. दरम्यान, काल बारामती येथे जाहीर सभेत आपण सत्तेसाठी नाही तर केवळ विकासासाठी सत्तेत सहभागी झाल्याचे अजित पवार म्हणाले होते. यावेळी देशात मोदींसारखे दुसरे नेर्तृत्व आता तरी नाही. हे सत्य नाकारून चालणारच नाही. मोदींसारखा काम करणारा दुसरा नेता या देशात नाही, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, अजित पवार म्हणतात पंतप्रधान मोदींसारखा काम करणारा कोणी नाही. त्यांना आत्ताच हा दृष्टांत का झाला? 10-20 वर्षांपूर्वी तो का झाला नाही हा प्रश्न आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, अजित पवार सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच ते भाजपसोबत गेले आहेत. अजित पवार मी सत्तेसाठी गेलो नाही, हे सत्य सांगत आहेत. कारण ते ईडीच्या भीतीमुळे राष्ट्रवादीतून फुटून बाहेर पडले आहेत. सत्ता ही सर्वोच्च म्हणूनच पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय झाला असावा. विजय वडेट्टीवार म्हणाले, मी यापूर्वीच मुख्यमंत्री झालो असतो असे वक्तव्य अनेकदा अजित पवार यांनी केले आहे. याचा अजितदादांच्या मनात मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा आहे. ती पूर्ण करण्यासाठी ते गेले असते तर समजू शकलो असतो. पण, अजित पवार काही मुख्यमंत्री झाले नाही. अजित पवार इकडून तिकडे आणि तिकडून इकडे गेले, पण, त्यांना उपमुख्यमंत्रीपदच मिळाले. त्यामुळे ते सत्तेसाठी नाही तर ईडीच्या भीतीनेच भाजपसोबत गेले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम