एक वर्षानंतर नवज्योतसिंग सिद्धू येणार तुरुंगा बाहेर ; हे होते प्रकरण !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ मार्च २०२३ ।  पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू रोड रेज प्रकरणी तुरुंगात आहे ते उद्या १ एप्रिल रोजी पतियाला तुरुंगातून सुटका होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सिद्धू यांची सुटका शनिवारी (१ मार्च) होणार आहे. त्यांच्या ऑफिशीयल ट्विटर हँडवरून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. यानंतर सिद्धू यांच्या समर्थकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. रोड रेज प्रकरणात सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती, यानंतर त्यांनी २० मे रोजी पटियाला कोर्टात आत्मसमर्पन केलं होतं.

आतापर्यंतच्या शिक्षेत सिद्धू यांनी एकदाही पॅरोल घेतलेला नाही. अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये कैदी वगळता इतर सर्वांना त्यांची कारागृहातील वर्तनाच्या आधारे महिन्यातून चार ते पाच दिवसांची सवलत दिली जाते. याशिवाय काही सरकारी सुट्ट्यांचाही लाभ कैद्याला मिळतो. अशा परिस्थितीत या सवलतीचा फायदा घेत सिद्धूची एक एप्रिलला तुरुंगातून सुटका होऊ शकते. यापूर्वीच २६ जानेवारी २०२३ रोजी सिद्धू यांची सुटका होणार असल्याची चर्चा होती मात्र प्रजासत्ताक दिनापूर्वी कैद्यांच्या सुटकेचा प्रस्ताव पंजाब मंत्रिमंडळात ठेवण्यात आला नव्हता. सिद्धूची सुटका न झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांना निराश व्हावे लागले. सिद्धू यांच्या पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनीही ट्विट करून पंजाब सरकारवर हल्लाबोल केला होता. सिद्धू यांनी तुरुंगात योग आणि ध्यान धारना यावर पूर्ण भर दिला आहे. शिक्षे दरम्यान सिद्धू यांनी आपले वजन ३४ किलोने कमी केले आहे. रोज पहाटे तीन वाजता उठल्यावर ध्यान धारणा करत. योगासोबतच ते तुरुंगाच्या आवारात भरपूर फिरायचे, अशी माहिती समोर आली आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम