नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ;कोर्टाने दिले कारवाईचे आदेश

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ नोव्हेबर २०२२ राज्यातील भाजप सोबत असलेले काही अपक्ष आमदार व खासदार यांच्या अडचणीत वाढ होत असतांना दिसत आहे. नुकतीच मुंबई न्यायालयाने सोमवारी खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी नवे अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणीची तारीख 28 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. सोमवारी हे प्रकरण सुनावणीसाठी आले असता, पोलिसांनी राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी आणखी वेळ मागितला. यावेळी कोर्टाने प्रकरणाची गंभीर दखल घेत पुन्हा एकदा कारवाईचे आदेश दिले आहेत.

मात्र, न्यायालयाने पोलिसांची विनंती फेटाळून लावत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.यापूर्वी सप्टेंबरमध्ये न्यायालयाने खासदार राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, त्याची अंमलबजावणी झाली नाही. याआधीही अमरातवीच्या खासदार नवनीत राणा यांना बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी मुंबईतील शिवडी महागनर दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

नवणीत राणा यांच्याह त्यांचे वडील हरभजन सिंह यांच्याविरोधातही अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. विशेष म्हणजे महागनर दंडाधिकारी न्यायालयाकडून आतापर्यंत दोनवेळा नवनीत राणा व त्यांच्या वडीलांविरोदात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यामुळे नवनीत राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शाळा सोडल्याच्या बनावट दाखल्यावरुन नवनीत राणा यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले. तसेच, नवनीत राणांच्या वडिलांनी फसवणूक करुन हे प्रमाणपत्र मिळवले, असा आरोप आहे. या प्रकरणी नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध मुंबईतील मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्यावरुन नवनीत राणा व त्यांच्या वडिलांविरोधात कलम 420, 468, 471 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम