राष्ट्रवादीचे ठरले ; डॉ.कोल्हेना लोकसभेसाठी दिलासा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जून २०२३ ।  सध्या सर्वच पक्षांनी आगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी बाशिंग बांधले असतांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आता उमेदवारीबाबत शिक्केमोर्तब केली आहे. यात डॉ.अमोल कोल्हे यांच्या खासदारकीच्या उमेदवाराची प्रश्न सुटला आहे.

शिरूर लाेकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमकी उमेदवारी काेणाला मिळणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या हाेत्या. विद्यमान खासदार डाॅ. अमाेल काेल्हे यांनी आपण पुन्हा लाेकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले हाेते. मात्र, भाेसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने सदर दाेघात चुरस निर्माण झाली हाेती.

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातल्या निर्सग मंगल कार्यालय येथे साेमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांचे उपस्थितीत पक्षातील महत्त्वपूर्ण नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी शिरूर लाेकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने आढावा घेण्यात आला आणि त्यावर मतदारसंघातील प्रमुख नेत्यांशी विचार विनिमय झाला. यावेळी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत पवार यांनी आगामी २०२४ च्या लाेकसभा निवडणुकीसाठी शिरूर मतदारसंघातून डाॅ. अमाेल काेल्हे यांच्या नावावर शिक्कामाेर्तब केले. त्यामुळे काेल्हे यांना दिलासा मिळाला असून, पक्षांर्तगत गटबाजी राेखण्यात त्यांना यश आले आहे.

याबाबत डाॅ. अमोल काेल्हे म्हणाले की, पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक् पार पडली. 2019 मध्ये सर्व कार्यकर्ते, नेत्यांनी ताकदीने निवडणूक लढविण्यास मला मदत केली. माजी आमदार विलास लांडे हे ज्येष्ठ नेते असून त्यांची साथ आमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या निवडणुकीत भाेसरी मतदारसंघात विलास लांडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हाेती. तशाचप्रकारे आगामी निवडणुकीत त्यांची साथ माझ्यासाठी बहुमूल्य आहे. निवडणुक लढविण्यासाठी काेणी इच्छा व्यक्त करणे यात काेणतेही गैर नाही. माजी विलास लांडे म्हणाले की, शरद पवार यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. संसदपटू व उत्कृष्ट वक्ता, अभिनेता म्हणून डाॅ. काेल्हे हे परिचित आहेत. मला 2009 मध्ये लाेकसभा निवडणुकीचे तिकीट दिले हाेते. 2019 मध्ये मला पुन्हा तिकिट दिले जाणार हाेते. परंतु ऐनवेळी डाॅ. अमोल काेल्हे यांचा प्रवेश झाला आणि त्यांना तिकीट दिले गेले. उमेदवारीसाठी मी केवळ इच्छा व्यक्त केली हाेती. याबाबत पवार यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तिकीट प्रश्नावर पडदा पडलेला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम