फडणवीसांनी दिली सचिनला मोठी जबाबदारी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० मे २०२३ ।  क्रिकेटचे मैदान आपल्या दमदार कामगिरीने गाजविणारे मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे ब्रँड ॲम्बेसेडर असणार आहेत. राज्य शासनाच्याकडून राबवल्या जाणाऱ्या या अभियानासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी सचिन तेंडुलकर यांनी तयारी दाखवली आहे.

याबाबतचा सामंजस्य करार आज करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सचिन तेंडुलकर हे या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे कार्य करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, सचिन तेंडुलकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी आज सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम पार पडला.

सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही यावेळी मंत्री महाजन, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शिफारस करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून ‘महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान‘ म्हणजेच ‘स्वच्छ मुख अभियान‘ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम