राष्ट्रवादी पडणार महाविकास आघाडीतून बाहेर ? ; ज्येष्ठ नेत्यांचे सूचक विधान !
दै. बातमीदार । ८ मे २०२३ । राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर हा राजीनामा मागे घेतल्याने विरोधकांनी राष्ट्रवादीला टार्गेट केले होते. त्यात आता ठाकरे गटाचे नेत्यांनी टीकास्त्र केल्याने राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा ठाकरे गटाला दिला आहे. त्यामुळे राजकीय गोटात पुन्हा मविआमध्ये फूट पडणार अशी चर्चा रंगली आहे.
सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य करत ‘वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले.’ असा आरोप केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मविआतून बाहेर पडण्याचा इशारा दिली आहे. त्यामुळे राऊत यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवार साहेबांनी लोक माझे सांगाती पुस्तकात जे म्हणले होते त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मग संजय राऊत यांना काय अडचण आहे? संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे ? असे सवाल उपस्थित केले.
तसेच, राऊत यांना असे वाटते का, का, की राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे. मतभेद निर्माण व्हावेत. तुमचं जेवढ आयुष्य आहे तेवढं शरद पवार साहेबांचा राजकारण आहे. राष्ट्रवादी मध्ये सुद्धा अजित पवार,सुप्रिया सुप्रिया सुळे,जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत. ते कुणाच्या घरात गेले होते त्यांनाच माहिती. इतकं लक्ष त्यानी शिंदे गट आणि त्यांच्या बॅगवर ठेवले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. अशी कोपरखळीदेखील भुजबळ यांनी राऊतांना मारली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम