नेहाच्या बोल्ड व्हिडीओने चाहते क्लिनबोल्ड; व्हीडीओ व्हायरल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ ऑक्टोबर २०२२ । फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे. नेहमीच सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या बोल्ड अंदाजाने सगळ्यांनाच क्लिनबोल्ड करते. नेहा ‘बिग बॉस 12’ या रिएलिटी शोचा भाग होती. शो दरम्यान नेहा अनेकांची पसंती ठरली होती. नेहा तिच्या इंस्टाग्रामवर चांगली सक्रिय असते. नेहाचे इंस्टाग्रामवर 1.8 मिलियन हून अधिक फॉलोवर्स आहेत. ती तिच्या चाहत्यांच्या मनोरंजनाकरिता नेहमीच फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकतंच तिनं इंस्टाग्राम वर एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. या व्हिडिओत ती वेगवेगळ्या अंदाजात पोज देताना दिसत आहे. तिने त्या व्हिडिओत बॉडी फिटिंग कपडे परिधान केले आहेत. तिची मादक स्टाईल पाहून काहीच वेळात चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर 53 हजार 24 लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे.

 

या व्हिडिओवर नेहाच्या चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. कमेंट बॉक्समध्ये चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की, बिग बॉस. तर दुसऱ्या चाहत्याने लिहीलंय की, आऊटस्टँडिंग लूक तर अजून एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की, आऊट ऑफ द वर्ल्ड.आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, नेहा ‘भाभीजी घर पर है’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेत अनिता भाभी हे पात्र साकारत होती. काही कारणास्तव नेहानं त्या मालिकेला निरोप दिला पण तिच्या त्या भूमिकेमुळे नेहा घरोघरी पोहचली ते पात्र लोकांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिलं आहे. नेहा तिच्या दमदार अभिनयाने सगळ्यांचंच मनोरंजन करत असते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम