नवविवाहित महिला गुगलवर सर्च करतात हे प्रश्न !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ मार्च २०२३ ।पूर्वीची एक परंपरा होती कि प्रत्येक मुलीचे लग्न झाले कि तिला घरातील जेष्ठ मंडळी सर्व काही नियम व्यवस्थित सांगत होते. पण गेल्या काही वर्षापासून घरातील जेष्ठ मंडळीना काही गोष्ठी तरून नवविवाहिताना सांगणे अवघड जात असल्याने सध्याच्या युगातील तरुणी गुगलचा आधार घेत आहेत. गेल्या काही दशकांमध्ये गुगल हे जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन ठरलं आहे. याच गुगलवर विवाह महिला काय सर्च करतात हे तुम्हाला माहिती आहे का? एका रिपोर्टमध्ये हे सत्य उघड झालं आहे.

विवाहित महिलांचं गुगलवर सर्च!
लग्न हे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा बदल घडविणारी गोष्ट आहे. महिलांसाठी तर लग्नामुळे पूर्णपणे आयुष्य बदलून जातं. नवीन घर, नवीन माणसं प्रत्येक गोष्ट त्यांसाठी नवीन असते. त्यात प्रत्येकाकडून असलेल्या अपेक्षा…अशात आपण हे नातं निभावू शकू का? नवऱ्यासोबत कसं नातं असावं, लग्नानंतर नेमकं काय काय बदल होतात. असे एक ना हजार प्रश्न त्यांचा मनात सुरु असतात. काही भावना त्या घरातील त्यांचा जवळच्या व्यक्तीवर बोलतात. कधी कधी मैत्रीणींकडे त्या मोकळ्या होतात. पण अनेक वेळा महिला गूगलचा सहारा घेतात. त्यावर अनेक गोष्टी सर्च करतात. तुम्हाला जाणून आश्चर्याचा धक्का बसेल जेव्हा तुम्हाला कळेल त्या काय काय सर्च करतात ते…

‘या’ गोष्टी करतात सर्च!
चला तर जाणून घेऊयात विवाहित महिलांना काय जाणून घ्यायचं असतं ते…त्यांचा पहिला प्रश्न असतो पतीचं मन कसं जिंकू शकतो? त्यांना कसं आनंदी ठेवायचं? लग्नानंतरमूल होण्यासाठी योग्य वेळ कोणती? लग्नानंतर त्यांच्या नवीन कुटुंबात कसं वागलं पाहिजं, त्या कुटुंबाचा, सासरचा भाग कशा बनतील? कुटुंबाची जबाबदारी कशी उचलावी? लग्नानंतर स्वतःचा व्यवसाय कसा चालवायचा आणि व्यवसायासोबत संसार कसा सांभाळायचा याशिवाय एक विचित्र गोष्ट सर्च झाली आहे ती म्हणजे नवऱ्यांना जोरूचा गुलाम कसा बनवायचे. अशाप्रकारची प्रश्न विवाहित महिलांना असतात. प्रेम, विश्वास आणि जरा समजूतदारपणा या गोष्टी असतील तर संसार सुखाचा होतो. मग बाकी सगळ्या गोष्टी सहज होतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम