मोठी बातमी : कृषी मंत्र्यांनी केली खत विक्री कंपनीचा परवाना निलंबित !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जुलै २०२३ ।  राज्यात शिंदे व फडणवीस सरकारसोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील सत्तेत सहभागी झाल्यावर राज्याच्या कृषीमंत्री पदी अजित पवार यांच्या गटाचे धनंजय मुंडे असून त्यांनी नुकतेच राज्यामध्ये बोगस खतं आणि बियाणं विक्री होते त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. कित्येकदा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येतं. त्यामुळे पैसा आणि वेळ दोन्हीही हातचं जातं.

बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातून तक्रारी आल्या नंतर कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई करत, ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित केला आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली.

बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातून तक्रारी आल्या नंतर कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई करत, ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित केला आहे. बोगस खते-बियाणे यांची विक्री कृषी विभाग खपवून घेणार नाही. या कारवाईत सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन, बोगस खत-बी-बियाणे यांच्याबद्दल तक्रारी असतील तर शेतकरी बांधवांनी 9822446655 या नंबरवर whatsapp करावे, ही विनंती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम