मोठी बातमी : २ हजारांच्या नोटा बदलविण्यासाठी ओळखपत्राची गरज नाही !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ मे २०२३ । दोन दिवसापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजाराची नोट कालबाह्य केल्यानंतर देशातील अनेक नागरिकांना मोठा धक्का बसला होता. पण यात चार महिन्याची मुदत दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर आज पुन्हा एकदा स्टेट बँकेने मोठा निर्णय घेतला आहे.

स्टेट बँकेने रविवारी 2000 च्या नोटा बदलण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. भारतातील सर्वात मोठ्या बँकेने म्हटले आहे की, 2000 च्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता नाही. कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही. एका वेळी 10 नोटा बदलता येतील.

नोटा बदलण्यासंबंधी सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँकेने ही अधिसूचना जारी केली आहे. नोटा बदलून घेण्यासाठी आधारसारखा आयडी आवश्यक असेल व फॉर्मही भरावा लागेल, असे दावे सोशल मीडियावर करण्यात येत होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. आरबीआयने 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये अशा नोटा बदलून घेण्यास किंवा खात्यात जमा करण्यास सांगितले आहे. या नोटा त्यानंतरही कायदेशीर राहतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम