
निमगव्हाण-वैजापूर रस्त्याचे काम सुरू; आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिली भेट
निमगव्हाण-वैजापूर रस्त्याचे काम सुरू; आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिली भेट
चाळीसगाव: निमगव्हाण ते वैजापूर या २८ किलोमीटर लांबीच्या ट्रिमिक्स काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाला ४ सप्टेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष सुरुवात झाली. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. त्यांनी कंत्राटदाराला काम प्रमाणित मापदंडानुसार आणि उच्च दर्जाचे (गुणवत्तापूर्वक) करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, ॲड. शिवराज पाटील, संचालक किरण देवराज, निवृत्ती पाटील, गणेश पाटील, संदीप सोनवणे, तसेच निश्चल पाटील, दशरथ बाविस्कर, राजेंद्र पाटील, सीताराम कोळी, दीपक चौधरी, प्रदीप बारी, कैलास बाविस्कर, अनु ठाकूर, समाधान कोळी, अमोल कोळी, अशोक पाटील, गजानन कोळी, धनराज पाटील, सुनील पाटील, प्रवीण धनगर, बाळू पाटील, अशोक बापू पाटील, मधुकर पाटील, प्रताप पाटील, योगेश पाटील, वाल्मीक पाटील, लखा धीवर, भैय्या धीवर, धना पांचाळ, विकास भोई, धनराज बाविस्कर, गब्बर पाटील, सुभाष कोळी, रमेश पाटील, के. शव बाविस्कर, बाळू कोळी, सुनील टेलर, संभाजी पाटील आणि भिका पाटील यांसह निमगव्हाण परिसरातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सोयीची होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम