उप मुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी)
: अमळनेर तालुक्यातील माजी जि.प. सदस्य इंजि.गिरीश सोनाजी पाटील यांची महाराष्ट्र चित्रपट,कला व सांस्कृतिक सेल च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गिरीश पाटील यांनी अमळनेर येथील मेळाव्यात ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.आमदार अनिल पाटील यांच्या शिफारशी वरून उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या हस्ते आज त्यांना मुंबई येथील प्रदेश कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव व नरेंद्र राणे, राष्ट्रवादी चित्रपट, कला व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश समन्वयक संतोष साखरे उपस्थित होते. त्यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम