कितीही पेट्या व खोके खर्च केले तरी मतदार आमच्या बाजूने – आ.एकनाथराव खडसे
दै. बातमीदार | १० नोव्हेंबर २०२२ | जिल्हा दूध संघाची अर्थी परिस्थिती सुधारली असून जिल्हा दूध संघ अगोदर डबघाईस आला होता . दूध संघाची आर्थिक परिस्थिती सुधारली असून मंत्र्यांना मंत्रिपदापेक्षा दूध संघाचा त्यांना मोह असल्याची टीका एकनाथराव खडसे यांनी .करून कितीही पेट्या आणि खोके खर्च केले तरी मतदार आमच्या बाजूने राहतील असा विश्वास खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला.तसेच आम्ही भ्रष्टाचार केला असले तर ५ वर्षांचे फॉरेन्सिक ऑडिट तपासावे असे आव्हान त्यांनी दिले.
यावेळी माजीमंत्री गुलाबराव देवकर, संदीप पाटील उपस्थित होते . बोलताना एकनाथराव खडसे म्हणाले कि,दूध संघासाठी त्यात्या तालुक्यातील प्रतिनिधी उभा केला जात होता . एका तालुक्यातील उमेदवार दुसर्या तालुक्यात उभा राहत असल्याचे दिसून येत आहे. १५ उमेदवारांना जिल्ह्यातील मतदार मतदान करतील. मतदारांचे नाव मतदार यादीत आवश्यक आहे.
मुक्ताईनर , भुसावळ तालुक्यात सत्ताधार्याना उमेदवार मिळत नसल्याने त्यांच्याकडून दबाव टाकला जात आहे असा माझा आरोप असल्याचे एकनाथराव खडसे यांनी सांगितले . नियम बदलून राजकीय दबावात हि निवडणूक पार पाडल्या जात आहे. दूध संघाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी मी प्रयत्न केल्याचे खडसे यांनी सांगितले.संचालक मंडळाच्या निवडीनंतर हेतुपुरस्सर तक्रारी केल्या.गेल्या. उच्च न्यायालयाने संचालक मंडळ बरखास्त केले. . मात्र दूध संघातील चोरीप्रकरणी टाळाटाळ करण्यात आली. दूध संघाच्या कारभाराची चौकशी पोलीस करीत असून चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असून पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सत्ताधारी करीत असल्याचा आरोप एकनाथराव खडसे यांनी केला. पोलीस नेहते यांच्यावर दबाव आणत असून परदेशी नामक एपीआय यांच्याकडून चौकशी काढण्याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. ५ वर्षाचे फॉरेन्सिक ऑडिट करावे १ रुपयाचाही अपहार झालेला नाही असा दावा खडसे यांनी केला. आम्ही प्रामाणिकपणे काम केले असून कितीही पेट्या आणि खोके खर्च केले तरी मतदार आमच्या बाजूला राहतील आणि विजय आमचाच होईल असे त्यांनी सांगितले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम