दै. बातमीदार । १८ ऑगस्ट २०२२ । जळगाव येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे कान, नाक, घसा यांची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिराचा 95 जणांनी फायदा घेतला.
मुंबई येथील इएनटी सर्जन डॉ. सुषमा मनसुखानी व ऑडिओलॉजिस्ट गौरव पाटील यांनी तपासणी व मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष सुनील आडवाणी, सचिव निखील चौधरी, डॉ. दिपक अटल, निलेश जैन, सतिष मंडाेरा, प्रवेश मुंदडा, सुमीत छाजेर, राहुल कोठारी, चंदर तेजवाणी, प्रिती मंडाेरे, विनायक बाल्दी, हर्षल आडवाणी, मनीष पाटील, स्वप्नील पलोड, रेणू आडवाणी, रघुनंद मंडाेरे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम