ऑनलाईन नाही आम्ही थेट फिल्डवर्कवर ; शिंदेंचा ठाकरेंना टोला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ मे २०२३ ।  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच रत्नागिरी दौऱ्यावर असतांना शासन आपल्या दारी हा उप्रकम राबविणार आहे. या कार्यक्रमात अनेक योजनांमधील लाभार्थी देखील उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वसामान्यांचे हिताचे ३५० निर्णय आम्ही घेतले. जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे आमचे सरकार आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही परिस्थिती आम्हाला थांबवायची आहे. अडीच वर्षातील कारभार जनतेने पाहिला आहे. आम्ही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही. चकरा, खेटे घेणे हे शब्द काढूव टाकायचे आहेत. पूर्वीसारखे स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले. आता गाडी सुसाट आहे. ऑनलाईन नाही आम्ही थेट फिल्डवर्क करत आहोत, असे शिदें म्हणाले. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून उभा असलो तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे, अशे शिंदे म्हणाले. मी फेसबुकवर बोलत नाही. फिल्डवर्क करतो. आम्ही २४ तास काम करणारे कार्यकर्ते आहोत. बाळासाहेब आणि दिघे यांची शिकवणी मी आचारणात आणत आहोत, असे देखील शिंदे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम