जुनी पेन्शन नाहीच तर अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सुविधा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ एप्रिल २०२३ ।  राज्यात गेल्या महिन्यात जुनी पेन्शनसाठी लाखो कर्मचारी रस्त्यावर उतरत आंदोलने केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देत तूर्त आंदोलन स्थगित झाले आहे पण आता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. तर, काँग्रेसशासित छत्तीसगड, राजस्थान, झारखंड, हिमाचल प्रदेश तसेच आपचे सरकार असलेल्या पंजाबमध्येही जुनी पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारनेही जुनी पेन्शन योजनेविषयी अनुकूलता दर्शवली आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही पावले न उचलल्याने अखेर ऐन अधिवेशन काळात राज्यातील सुमारे १४ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम