‘व्हॅलेंटाईन डे’ नव्हे तर या दिनाने होणार १४ फेब्रुवारी साजरा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ फेब्रुवारी २०२३ । जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ हा दिवस १४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवसासाठी बाजार पेठा सजण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, त्याआधी पशु कल्याण मंडळाने व्हॅलेंटाईन डे ऐवजी 14 फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ साजरा करण्याची मागणी केली आहे. 14 फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावे आणि व्हॅलेंटाईन डे ऐवजी ‘काऊ हग डे’ साजरा करावा, असे आवाहन प्राणी कल्याण मंडळाने केले आहे.

 

AWBA जारी केलेल्या पत्रात लिहिले आहे की, आपल्या सर्वांना माहित आहे की गाय भारतीय संस्कृतीचा आधार आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली संस्कृती आणि वारसा विसरला आहे. गायीला मिठी मारल्याने भावनिक उन्नती होते. म्हणूनच गाईवर प्रेम करणाऱ्या लोकांनी १४ फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ साजरा करावा. तसेच हा दिवस साजरा करताना गायीला आपली माता समजा असे AWBA ने पत्रात म्हटले आहे. गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, ती जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. मानवतेला सर्वस्व देणार्‍या मातेप्रमाणे पोषण देणार्‍या स्वभावामुळे ती कामधेनू आणि गौमाता म्हणून ओळखली जाते असे AWBA ने म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम