
कुख्यात डॉन गवळी येणार चार दिवस बाहेर !
दै. बातमीदार । १५ नोव्हेबर २०२२ नागपूर कारागृहात कैदी असलेला राज्याचा कुख्यात डॉन अरुण गवळीला नुकतीच पॅरोल मंजूर झाला आहे. मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळी बाहेर येणार आहे. मुलाच्या लग्नासाठी बाहेर येणार आहे. 17 नोव्हेंबरला अरुण गवळीच्या मुलाचं लग्न आहे. त्यासाठी पॅरोलची मागणी केली होती. चार दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे.
पोलिसांच्या संरक्षणासह गवळीने मुंबईला जावं अशी अट कारागृह प्रशासनाने घातली होती. मात्र याचा खर्चही अरुण गवळीला करावा लागेल अशी अट घालण्यात आली होती. या विरोधात अरुण गवळीने न्यायालयात दाद मागितली होती. आता अरुण गवळीला पॅरोल मंजूर झाला आहे पण पोलिसांच्या सुरक्षेशिवाय जाता येईल असा निर्णय कोर्टाने दिला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम