
आता Apple USB-C पोर्टसह नवीन आयफोन करणार लाँच
दै. बातमीदार । २६ ऑक्टोबर २०२२ । Apple ने शेवटी USB-C चार्जिंग पोर्टचा पर्याय स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपलने म्हटले आहे की आगामी iPhones हे टाइप-सी पोर्टसह येतील. त्यामुळे आगामी आयफोन 15 किंवा 16 सीरीज ही टाइप-सी चार्जिंग पोर्टसह ऑफर केली जाईल अशी अपेक्षा आहे. जगभरात आयफोनचे कोट्यावधी वापरकर्ते आहेत. त्यांच्यासाठी कंपनीने मोठी घोषणा केली आहे.
अॅपलचे मार्केटिंग हेड ग्रेग जोसविक (Greg Joswiak) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. Apple च्या iPhone साठी USB-C वर स्विच करण्याच्या योजनेबद्दल विचारले असता, Joswiak म्हणाले, हे स्पष्ट आहे की, आम्हाला त्याचे पालन करावे लागेल, आमच्याकडे पर्याय नाही. महत्वाचे म्हणजे युरोपियन युनियनने 2024 पासून सर्व डिव्हायसेसना टाइप-सी पोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत.
जोसविक यांनी असेही म्हटले आहे की केवळ युरोपियन युनियन देशांमध्येच नव्हे तर जगातील सर्व देशांमध्ये विकल्या जाणार्या आयफोनमध्ये यूएसबी-सी पोर्ट देखील असतील. अशा स्थितीत अॅपलला भारतीय बाजारपेठेसाठी मोठे बदल करावे लागणार नाहीत, कारण भारत सरकारही कॉमन चार्जरचा विचार करत आहे. सध्या, Apple चे iPhones आणि iPads लाइटनिंग पोर्टसह येतात, जे Apple चे एक्सक्लुसिव्ह पोर्ट आहे. अॅपलशिवाय अन्य कोणतीही कंपनी या चार्जिंग पोर्टचा वापर करत नाही. नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 14 सीराजसह Type-C पोर्ट देणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम