आता सरकारी रुग्णालयातही किडनी, लिव्हर ट्रान्सप्लांट !
बातमीदार | १० सप्टेंबर २०२३
अनेक सर्वसामान्य रुग्णांना किडनी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो, तो परवडत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात किमान मुंबई, नागपूर, पुणे येथील सरकारी रुग्णालयांत किडनी, ट्रान्सप्लांट सुविधा सुरू करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी केली.
येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या छत्रपती प्रमिलाराजे सेवा रुग्णालयामध्ये (सीपीआर) कॅन्सर आणि होमिओपॅथी सेवा उद्घाटनावेळी ते बोलत होते. या रुग्णालयात डॉ. सूरज पवार, डॉ. रेश्मा पवार यांच्या कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या सहकार्याने कॅन्सर रुग्णांची तपासणी आणि शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गरजू रुग्णांना या वैद्यकिय सेवांचा लाभ घेता येणार आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम