खंडाळा घाटात ऑईलच्या टँकर भीषण आग ; तिघांचा मृत्यू !
दै. बातमीदार । १३ जून २०२३ । राज्यात सध्या उन्हाचे तापमान वाढत असतांना एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात एका ऑईलच्या टँकरला लागलेल्या भीषण आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यु झाला. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे एक ते दीड तास द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळयाजवळ खंडाळा हद्दीत ओव्हर ब्रीजवर सोमवारी एक ऑईलचा टँकर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात टँकरने पेट घेतल्याने त्याला भीषण आग लागली. त्यामुळे ब्रीजखालून जाणाऱ्या गाडयावरही ऑईल सांडून गाडयांनी पेट घतला. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्यावर ऑईल सांडल्याने एक दुचाकीस्वार यावरून घसरला. यामध्ये दुचाकीवरील 12 वर्षांचा मुलगा होरपळून ठार झाला. तर, त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले.
दुर्घटनेनंतर पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुर्घटनेत टँकर चालकही गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातामध्ये आतापर्यंंत एकूण ३ ठार आणि ३ गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. सध्या या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात आली. युध्दपातळीवर बचाव कार्य करत येथील वाहतूक लोणावळा शहरातून वळविण्यात आली. त्यामुळे दुतगती महार्गावर वाहतूकीची कोंडी झाली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम