‘ओएमजी-२’ चित्रपटातील अभिनेत्याच्या वडिलांचे निधन !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ ऑगस्ट २०२३ | अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट आल्याने अनेक चाहते मोठ्या आनंदाने चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. तर ‘ओएमजी-2’ दुसरीकडे याचे चित्रपटातील अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. बेलसंड या गावी त्यांनी अखेरचा श्वास श्वास घेतला. वडिलांच्या निधनाचे वृत्त कळताच पंकज त्रिपाठी गावी रवाना झाले आहेत.

पंकज त्रिपाठी बिहारमधील गोपालगंज येथील रहिवासी आहेत. चित्रपटसृष्टीत काम करत असल्याने पंकज त्रिपाठी मुंबई राहतात, तर त्यांचे आई-वडील गावी रहात होते. आई-वडिलांची भेट घेण्यासाठी ते नेहमीच गावी जात होते. मुलाखतींमध्येही त्यांनी अनेकदा आपल्या वडिलांचा उल्लेख केला होता. वडिलांना चित्रपटसृष्टीत रस नसल्याचे पंकज त्रिपाठी यांनी म्हटले होते. एवढेच नाही तर आपला मुलगा चित्रपटसृष्टीत काय काम करतो हे देखील त्यांना माहिती नसल्याचे पंकज त्रिपाठी यांनी सांगितले होते. आपले वडील फक्त एकदाच मुंबईला आले होते. त्यांना मोठे घरं आणि उंच इमारती आवडत नाहीत. त्यांनी कधी चित्रपटगृहात सिनेमाही पाहिलेला नाही. घरीच ते माझे चित्रपट पाहतात, असेही पंकज त्रिपाठी यांनी सांगितले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम