आधार जेष्ठ नागरिक संघाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार…

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ सप्टेंबर २०२२ । जळगाव येथे आधार जेष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज एस.एम. आय.टी.कॉलेज मैदानावर घेण्यात आली व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष डॉ. संभाजी देसाई, अमृत पाटील, गजानन देशमुख, भिमराव पाटील होते.

प्रथम जिजामातेचे पूजन करून सभेला सुरुवात झाली. सभेत एकूण बारा जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस निमित्त रुमाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. संभाजी देसाई यांनी संस्थेच्या भरभराटी साठी व वास्तूचे बांधकाम करण्या साठी मदतीचे आव्हान केल्यामुळे ५० हजार रुपये जमा झाले.

या सभेला २०० च्या वर जेष्ठ नागरिकांनी सभेत सहभाग घेऊन एकुण सहा विषय मंजूर करण्यात आली. शरद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. गजानन देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकांना संघ उभारणीचा लेखाजोखा मांडला या वेळी आर.एल. मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करून २०० लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव प्रकाश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप नंतर नागरिकांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.यावेळी नगरसेविका सौ. प्रतिभा देशमुख यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला संतोष गावंडे, बळवंतराव चव्हाण, गुलाबराव देशमुख, पंढरीनाथ साळुंखे, शेखर पाटील, अनंतराव मगरे, नामदेव पाटील.सौ. अलका मगरे, राव मॅडम, साठे ताई, तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम