सासूबाईंच्या निधनाच खापर किरीट सोमाय्यावर; किशोरी पेडणेकरांचा आरोप
दै. बातमीदार । ३१ ऑक्टोबर २०२२ । भाजप व ठाकरे गटाचे शाब्दिक युद्ध थांबायचे नावच घेत नाही आहे, यातच भाजप नेते किरीट सोमाय्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात सध्या जागेवरून आरोप प्रत्यारोप यांचं सत्र सुरू आहे. अशातच किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या सासूबाईंच्या निधनाच खापर किरीट सोमाय्या यांच्यावर फोडलं आहे. किरीट सोमाय्या यांनी केलेल्या आरोपामुळे सासुबाईनी धसका घेतला असल्याचा आरोप पेडणेकरांनी केला आहे. माझ्या कुटुंबातील एका व्यक्तीचा बळी किरीट सोमाय्या यांनी घेतला आहे असा गंभीर आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
काही वेळापूर्वीच किशोरी पेडणेकर यांच्या सासुबाईंच निधन झालं परंतु, गेल्या तीन ते चार दिवसांपासून किरीट सोमाय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर काही आरोप केले आहेत. याच आरोपांचा धसका आपल्या सासूबाईंनी घेतला असल्याचं पेडणेकर यांनी म्हंटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत.बातम्या बघून त्यांना त्रास होत होता. गेले काही दिवस चालू असणाऱ्या बातम्या बघून त्यांनी धसका घेतला असल्याचे पेडणेकर म्हणाल्या. मी लढेन आणि जिंकून दाखवेन. किती त्यांना बोलायच बोलू देत मी त्यांना काहीच बोलणार नाही. मी कायद्याची लढाई लढेन असंही त्या म्हणाल्यात.
परवा रात्रीच्या बातम्या बघून त्या घाबरल्या त्या बातम्या बघून त्यांनी धसका घेतला. त्यांच आमच्यावर खूप प्रेम आणि काळजी होती त्या बातम्या बघून घाबरल्या. जे सत्य आहे ते सत्य आहे. त्या म्हणाल्या मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मी त्यांना भेटणार आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यावर किरीट सोमाय्या दबाव टाकत आहेत. मी सर्व पुरावे दिले आहेत. माझा त्या प्रकरणांशी काही संबध नाही. मला न्याय मिळेलच. असंही त्या म्हणाल्यात.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम