ईदच्या दिवशी शाहरुखची झलक पाहण्यासाठी चाहते भर उन्हात मन्नतच्या बाहेर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ एप्रिल २०२३ ।  शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. त्यामुळे ही ईद चाहत्यांसाठी खास आहे.

आज शनिवार २२ एप्रिल रोजी जगभरात ईद साजरी केली जात आहे. त्यामुळे शाहरुख खानचे चाहते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईतील त्याच्या मन्नत या निवासस्थानाबाहेर अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी जमले होते. सकाळपासूनच शाहरुख खान याच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी होऊ लागली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला हाेताे. अशात अलीकडेच शाहरुख खाननेही पठाणच्या यशाबद्दल एका संभाषणात जनता दर्शन बद्दल सांगितले. तो म्हणाला, ‘माझ्या वडिलधाऱ्यांनी मला असे सांगितले आहे की, जर तू दु:खी असेल तर त्या लाेकांकडे जा जे तुझ्यावर प्रेम करतात.’

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम