बातमीदार | १४ ऑक्टोबर २०२३
गेल्या काही दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात घसरण होत असतांना दोन दिवसापासून मात्र याच दरात वाढ होत आहे. इस्त्राइल-हमास युद्धाचा परिणाम सोन्यावर दिसून आला. मध्यवर्ती देशांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीसह सोन्या-चांदीवरही परिणाम झाला आहे. उच्चांकी दरापेक्षा सोन्याच्या किमतीत काही दिवसांपूर्वी ५ हजारांनी घट झाली होती. परंतु, काल ३ हजारांनी वाढ झाली.
आंतरारष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याने घरगुती किमतीही वाढल्या आहेत. महाराष्ट्रात आज सोन्याचा भाव किती यावर नजर टाकूया. गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार २२ कॅरेट सोन्यासाठी १ ग्रॅमचा भाव ५,५५५ रुपये तर २४ कॅरेटनुसार प्रतितोळ्यासाठी ६०,५९० रुपये मोजावे लागणार आहे. सोन्याच्या दरात आज १५३० रुपायंनी वाढ झाली आहे. आज प्रति किलो चांदीसाठी ७४,१०० रुपये मोजावे लागणार आहे. आज चांदीच्या दरात १५०० रुपयांनी वाढ झाली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम