विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा… गण गण गणात बोतेच्या गजरात दुमदुमली विदर्भ पंढरी

आषाढी एकादशी निमित्त दीड लाख भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन..

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ जुलै २०२२ । विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नगरी शेगाव शहरात आज १० जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी श्रींच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले विदर्भातील जे भाविक भक्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाहीत असे लाखो भक्त दरवर्षी शेगाव येथे पंढरीच्या विठोबाच्या व श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनानिमित्त शेगाव येथे येत असतात आषाढी एकादशी निमित्त नऊ जुलै पासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचे जथेच्या जथे शेगाव शहरात येत होते हजारो भाविक शेकडो किलोमीटर अंतर पायी चालत ‘गण गण गणात बोते “..’जय गजानन श्री गजानन”असा जयघोष करीत शेगाव शहरात पोहोचत होते त्यामुळे शेगाव खामगाव रोड शेगाव अकोट रोड शेगाव बाळापुर रोड शेगाव अळसना रोड, शेगाव नागझरी रोड इत्यादी सर्वच रस्त्यावर श्रींचे हजारो भक्त पैदल शेगाव कडे श्री गजानन महाराजांचे गण गण गणात बोते व जय गजानन श्री गजानन,विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे भजन गात शेगाव कडे येत असताना संपूर्ण रस्ते व शेगाव शहरातील मंदिराकडे जाणारे रस्ते गजानन मय झालेले दिसत होते. मागील दोन वर्षा पासून प्रशासनाने कोरोना महामारीमुळे भक्तांसाठी श्रींच्या मंदिरात दर्शनावर प्रतिबंध लावले असल्याकारणाने मागील दोन वर्ष शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात अंतर्गतच धार्मिक सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र यावर्षी राज्य शासनाने कोरोनाचे सर्व नियम मागे घेतल्यामुळे तसेच प्रतिबंध उठवल्यामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर शेगाव शहरात श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये आज १० जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीभाव पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. बाहेरगावावरून दर्शना निमित्त शेगावला आलेल्या भाविकांना मंदिरामध्ये श्रींचे दर्शन घेताना कोणताही त्रास होऊ नये त्यांची असुविधा होऊ नये याकरिता श्री संत गजानन महाराज संस्थान कडून संपूर्ण मंदिर परिसरात भक्तांच्या सेवेसाठी जागोजागी शेकडो सेवेकरी सेवा देत होते. श्रींच्या भक्तांसाठी उत्कृष्ट अशी व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे दिवसभरात जवळपास दीड लाख भाविकांनी शिस्तबद्ध रीतीने श्रींचे दर्शन घेऊन हजारो भाविकांनी श्रींचे २१ अध्यायाचे पारायण सुद्धा श्रद्धापूर्वक केले. मंदिर परिसरात चला माऊली चला माऊली रस्त्यात थांबू नका माऊली हा गजर कानावरू पडतात भाविकांमध्ये दर्शनासाठी पुढे सरकण्याची उत्साहवर्धक चेतना दिसून येत होती. श्रींचे दर्शन व पारायण केल्यानंतर भाविकांनी श्रींच्या मंदिर परिसरात असलेल्या महाप्रसादालयामध्ये मंदिराकडून फराळाची जी व्यवस्था करण्यात आली होती त्याचा आस्वाद एक लाखाचे वर भाविकांनी घेतला.

संध्याकाळी ठीक साडेपाच वाजे दरम्यान श्रींच्या मंदिर परिसरातून श्रीच्या मंदिर आवारातच श्रींच्या पालखीची परिक्रमा घालण्यात आली भक्तनिवास क्रमांक एक जवळून सुरू झालेली ही परिक्रमा संत गजानन महाराजांचे परमभक्त सेवक बाळाभाऊ महाराज जी यांच्या मंदिराजवळून पालखी निघून महाप्रसादालय क्रमांक एक व लायब्ररी अशा मार्गाने चालत श्रींची पालखी मंदिराच्या पश्चिम गेटमधून परत श्री संत गजानन महाराज मंदिरात पोहोचली यावेळी हजारो भाविकांनी परिक्रमा मध्ये सहभाग घेऊन श्रींच्या पालखीचे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले.

शाखा श्री क्षैत्र पंढरपूर
शाखा कार्यालय पंंढरपूर येथे वारीनिमीत्य आलेल्या सर्व वारकऱ्यांना नवमी, दशमी,एकादशी, बारस असे चार दिवस महाप्रसाद वितरण चालू आहे.
श्री संस्थानची नियमांची पूर्तता केलेल्या भजनी दिंड्यांना भजनी साहित्य १० टाळजोड, १ विणा, १ मृदंग व श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम महाराज गाथा व श्री एकनाथी भागवत या संत साहित्याचे वितरण करण्यात आले. आजपावेतो महाराष्ट्र गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तरखंड,आंध्रप्रदेश, कर्नाटक गोवा, तेलगंणा मघ्यप्रदेश या नऊ राज्यतील ७६ जिल्हामघ्ये आजपावेतो १८८४५ गांवाना भंजनी साहित्य वितरण करण्यात आले आहे व अखंड हि सेवा सुरू आहे. वारकऱ्यांचे सेवेत धर्माथ अँलोपँथीक फिरते रुग्णालय असुन भाविकांनी रुग्णसेवेचा लाभ घेतला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम