देशात कोणत्याही शहरात जावू शकतात या स्थानकाहून ; जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ एप्रिल २०२३ ।  देशातील अनेक लोकांचा प्रवास आजही भारतीय रेल्वेनेच करीत असतात त्याचे कारण देखील तसेच आहे. कमी वेळेत व सुरक्षित प्रवास म्हणून भारतीय रेल्वे आजही जगभरात ओळखली जाते. पण तुम्हाला देशातील कोणत्या कानाकोपऱ्यात प्रवास करायचा असेल तर तुम्हाला कोणत्या स्थानकावर गेल्यावर रेल्वे मिळणार हे माहित आहे का ? मात्र देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतंय तुम्हाला माहितीये का?

या स्टेशनवर दिवसरात्री चोवीस तार गर्दी राहते. या स्टेशनवर दररोज 600 ट्रेन धावतात. तर येथून दररोज जवळपास 10 लाख लोक आपला प्रवास सुरु करतात. आज आपण या अनोख्या आणि मोठ्या रेल्वे स्टेशनविषयी जाणून घेणार आहोत. देशातील सर्वात मोठ्या रेल्वे जंक्शनच नाव हावडा आहे. हे देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन आहेच, यासोबतच हे सर्वात व्यस्त असणारं रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर एकूण 23 प्लॅटफॉर्म आहेत. तर 26 रेल्वे लाइन आहेत. ज्यावरुन रोज जवळपास 600 ट्रेन पास होतात.

हावडा जंक्शनला देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्टेशनच्या यादीत जागा मिळाली आहे. कोलकातामधील हे रेल्वे स्टेशन टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 च्या नावाने देखील ओळखलं जातं. हावडाला देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्टेशनच्या यादीत जागा मिळालीये. कोलकातामध्ये हावडासह सियालदह नावाचं अजून एक मोठं रेल्वे स्टेशन देखील आहे. यासोबतच संतरागाछी, शालीमार आणि कोलकाता रेल्वे स्टेशनही आहे.

हावडा रेल्वे जंक्शन पूर्व विभागांतर्गत येते. या जंक्शनवरून दररोज 350 हून अधिक गाड्या त्यांच्या प्रवासासाठी जातात. तर एवढ्याच गाड्या येथे थांबतात देखील. देशातील सर्वात जुने रेल्वे स्थानक होण्याचा मानही या जंक्शनला मिळाला आहे. या रेल्वे स्थानकाची इमारत 1854 साली बांधण्यात आली. हे स्टेशन हुगळी नदीवर बांधलेल्या पुलाद्वारे कोलकाता मुख्य शहराला जोडते. येथून देशाच्या जवळजवळ प्रत्येक भागासाठी गाड्या पकडल्या जाऊ शकतात. या जंक्शनमध्ये एकाच वेळी जास्तीत जास्त गाड्या ठेवण्याची क्षमता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम