पिंपरी-चिंचवडमध्ये H3N2 व्हायरसने एकाचा मृत्यू !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १६ मार्च २०२३ । गेल्या २०१९ मध्ये कोरोनाने जगभर थैमान घातलेले असतांना आता पुन्हा नवीन व्हायरसने एन्ट्री घेतली आहे. H3N2 हा व्हायरने आता पिपरी चिंचवड येथे धडक दिल्याने यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची खात्रीलायक वृत्त आहे.

पुण्यात H3N2 चे 22 रुग्ण आढळले आहेत. तपासणीसाठी आलेल्या 109 संशयित रूग्णांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यात एका ७३ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.  H3N2 इन्फ्लूएंझा हा नवा विषाणू देशात वेगाने पसरतोय. तेव्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा तसंच काळजी घ्या असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिल्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा बळी घेतला आहे. H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा मृत्यू झाल्याने आता आरोग्य विभाग अलर्ट होत असतांना नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. सर्दी ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम