दै. बातमीदार । १० एप्रिल २०२३ । प्रत्येक पुरुष असो वा महिला आपली फिटनेस नेहमी व्यवस्थित असावे यासाठी काळजी घेत असतात. यासाठी आहार वेळेवर घेणे हा उपाय प्रत्येकाला माहित आहे पण अनेक जणांना तब्येतीच्या काही तक्रारी असतात. कुणाला हेल्दी वेटलॉस करायचा असतो. कुणाला सतता येणारा थकवा- अशक्तपणा घालवायचा असतो. कुणाला मासिक पाळीचा त्रास असतो. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी 1 ग्लास पाणी प्या. त्या पाण्यात इतर काहीही टाकण्याची गरज नाही. नुसतं प्लेन पाणी प्या. त्यानंतर केळी, भिजवलेले बदाम किंवा भिजवलेल्या काळ्या मनुका या ३ पैकी कोणताही एक पदार्थ खाऊन दिवसाची सुरुवात करा.
ज्यांना पचनाचा त्रास आहे, पोटात कायम गॅस झाल्यासारखं वाटतं, कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो किंवा जेवल्यानंतर कायम काहीतरी गोड खावंसं वाटतं त्यांनी केळी खाऊन दिवसाची सुरुवात करावी. केळ आवडत नसेल तर कोणतंही स्थानिक हंगामी फळ खा.
ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना दिवसभर स्क्रिनवर काम करावं लागतं, डोळे थकल्यासारखे वाटतात किंवा त्वचेचा पोत खराब झाल्यासारखा वाटतो, त्यांनी रात्रभर पाण्यात भिजवलेले 3 ते 4 बदाम खाऊन दिवसाची सुरुवात करावी. खाण्यापुर्वी बदामाची साले काढावीत.
ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे, गॅसेस- ॲसिडीटीचा त्रास आहे, मूड स्विंग्स होतात अशा लोकांनी रात्रभर पाण्यात भिजवलेल्या 4 ते 5 काळ्या मनुका खाव्या. मनुका भिजवलेलं पाणी प्यायलं तरी चालेल. हा प्रयोग 2 ते 3 महिने नियमित करून बघू शकता.
झोपेतून उठल्यानंतर 20 मिनिटांच्या आत हे पदार्थ खा. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी चहा- कॉफी घेतली तरी चालेल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम